|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » डॉ. प्रकाश पाटील सक्तीच्या रजेवर?

डॉ. प्रकाश पाटील सक्तीच्या रजेवर? 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील औषध खरेदीत घोटाळा झाल्याचे प्रथम दर्शनी अहवालात स्पष्ट झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गंभीर दखल घेतली असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांना मंगळवारपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे सुत्रांकडून समजते. मंगळवारी डॉ. आंनदीबाई जोशी  पुरस्कार वितरणानंतर तात्काळ कारवाई केल्याचे वृत्त आहे. याबाबत डॉ. खेमनार यांच्याशी संपर्क सधण्याचा प्रयत्न केला असता रात्री उशिरापर्यंत संपर्क होवू शकला नाही. अहवाल खुला करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून दबाव वाढू लागल्याने सीईओंनी तात्काळ कारवाई सुरू केली अशी चर्चा आहे.

 जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंदांसाठी औषध खरेदी केली जाते. यासाठी विविध विभागाकडून आलेला निधी वापरण्यात येतो. मध्यंतरी जिल्हा परिषद सदस्यांनी तक्रार  केल्यानंतर कागलकर हाऊस येथील औषध गोदामातील औषध साठय़ाची मोजदाज करण्यात आली. साठा तपासण्यासाठी एका औषध निर्मात्याची नियुक्ती केली होती. तपासणीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या होत्या. आवश्यक औषधांचा कृत्रिम तुटवडा दाखवून बाजारभावापेक्षा चौपट दराने खरेदी केल्याचे समोर आले. या प्रकरणात सुमारे 20 ते 25 लाखांचा ‘हात’ मारला असून या प्रकरणात दोन वरिष्ठ अधिकाऱयांचा हात असल्याने चौकशी अहवाल दाबून ठेवण्यात आल्याची जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा होती.