|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आदित्य माळी तबलावद्यात जिल्हय़ात पहिला

आदित्य माळी तबलावद्यात जिल्हय़ात पहिला 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई अंतर्गत कोल्हापूर जिह्यातील शालेय विद्यार्थी यांचा तबला वाद्य स्पर्धा टाऊन हॉल कोल्हापूर येथे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे येथील आदित्य सुरेश माळी याचा जिह्यात पहिला क्रमांक आला.

नोहेंबर 2017 रोजी आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई वतीने स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत जिल्हय़ातील सर्व तालुक्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. आदित्य याने आपला ठसा या वाद्यात उत्कृष्ठपणे उमठवला या बद्दल शाळेत त्याचे कौतुक होत आहे. आदित्यला प्रविण मोरे व आजी आजोबा यांचे मार्गदर्शन लाभले. तर मुख्याध्यापिका सुस्मीता मोहिती यांचे सहकार्य मिळाले. मार्च बंगलोर येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आदित्य माळी याची निवड झाली आहे.

 

Related posts: