|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बाजारपेठेत ‘मोटू पतलू’ टिमक्यांची क्रेझ

बाजारपेठेत ‘मोटू पतलू’ टिमक्यांची क्रेझ 

खरेदीसाठी बालचमुंची गर्दी :

प्रतिनिधी\ कोल्हापूर

होळी सणाची धामधुम सध्या सर्वत्र सुरू आहे. होळीसाठी लागणाऱया साहित्याने बाजारपेठा सजून गेल्या आहेत. बालकांना आकर्षित करणाऱया विविध प्रकारच्या टिमक्यां बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये फायबरच्या, चामडीच्या आणि निरनिराळ्या प्रकारच्या टिमक्या बाजारात आहेत.

सध्या बाजारात फायबरच्या टिमकीचे प्रमाण वाढले आहे. मोटू-पतलू, डोरेमॉन, मिकीमाऊस आणि विविध आकारात उपलब्ध असणाऱया फायबरच्या टिमक्या आहेत. यामुळे बालचमुंची फायबरच्या टिमक्यांना पसंती दर्शवली जात आहे. तर चामडय़ांच्या टिमकीचे प्रमाण कमी आहेत. असे असले तरी दोन्हीचे दर समान आहेत.

हलगी, टिमकी, हलगीच्या प्लेट, ढोल, सप्तरांगातील रंग, रांगोळींनी बाजारपेठ फुलून गेली आहे. टिमक्यांचे दर 50 रूपयांपासून पुढे आहेत. हलक्या आणि वाजवालया सुलभ असणाऱया या टिमक्यांना बालचमुंकडून विशेष पसंती मिळते आहे. विविध रंगातील आणि आकारातील टिमक्या लक्षवेधी ठरत आहेत. शहरातील पापाची तिकटी, महाद्वार रोड, बिंदू चौक, महानगरपालिका चौक, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी आदी भागांमध्ये टिमक्यांची रेलचेल सुरू आहे.

सामाजिक उपक्रम-

विविध सामाजिक संस्था आणि युवक मंडळांकडून वृक्ष संवर्धनाची जागृती करून शेणी दाण उपक्रम राबवण्याचे नियोजन आखले जात आहे. तसेच भव्य स्वरूपात होळी साजरी न करता प्रतिकात्मक पुजन करून परंपरा जपण्याचा प्रयत्न युवकांकडून केला जात आहे.