नेहरू वस्तीगृहातील गाळ्यांचे 28 लाख भाडे थकीत

प्रतिनिधी/ सोलापूर
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या जवाहरलाल नेहरू वस्तीगृहातील 17 गाळेधरकांकडे 28 लाख 67 हजार 117 रूपयाची थकबाकी आहे. यामध्ये प्रत्येक गाळ्यास प्रति महिन्याला 26 रूपये 70 पैसे चौरस फ्gढट इतका कमी दर असून देखील मोठय़ा प्रमाणात थकबाकी आहे. याबबात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱयांनी ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. कारण इतका कमी प्रमाणात गाळ्यांना दर असून देखील गाळेधारक वेळेवर गाळ्यांचे पैसे भरत नाहीत. ही खूपच गंभीर बाब असल्याचे दिसून येते.
जवाहर नेहरू वस्तीगृहामध्ये एकूण 17 गाळेधारक आहेत. 2013 पासून 31 डिसेंबर 2017 पर्यंत 94 लाख 18 हजार 206 रूपयाची वसुली करण्यात आली आहे. या गाळेधारकांबरोबर ऑगस्ट 2013 रोजी करार करण्यात आला होता की, प्रत्येक वर्षी 10 टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे. परंतु भाडेवाढ सोडा आहे ते भांडे थकीत आहे. या 17 गाळ्यामधील पोस्ट ऑफ्ढाrस या गाळेधारकांबरोबर करार झाला नाही. जिल्हा परिषदेच्या अटी मान्य नसल्यामुळे करारनामा केला नाही. थकीत गाळेधारकांना वसुलीबाबत नोटिसा देवूनही अद्याप कोणत्याही प्रकारे वसुली होत नाही. या गाळेधारकांमधील संतोष पवार, संतोष तुकाराम पवार व ब्रम्हदेवदादा माने सहकारी बँक या तीन गाळेधारकांकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नाही. उर्वरीत 14 गाळेधारकांकडे ही रक्कम थकीत आहे. या गाळेधारकांकडे एकूण 8622.52 क्षेत्रफ्ढळ चौरस फ्gढटाखाली गाळे आहेत.
याबाबत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱयांनी आवाज उठवण्याची गरज आहे. कमी प्रमाणात गाळेधारकांना शुल्क असून देखील मोठय़ा प्रमाणात थकीत रक्कम भरली जात नाही. एकीकडे जिल्हा परिषदेकडे उत्पन्नाची साधने नाहीत आणि आहे ते गाळेधारक जर वेळेवर गाळ्याची पैसे देत नसतील तर याचा परिणाम जिह्यातील विकास कामावर होणार आहे. करण सेसचा निधी जिल्हा परिषदेच्या विकास कामावर खर्च केला जातो. गाळेधारकांच्या वसुलीबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बैठक झाली. या बैठकीत शिक्षण विभागाला सेससाठी 6 कोटी 60 लाख रूपये मिळाले आहेत. तर थ्री डी तारांगणसाठी 3 कोटी रूपये, कपाटासाठी 3 कोटी रूपये 1 कोटी रूपये ईलर्निगसाठी नियोजित करण्यात आले
वसुलीबाबत बांधकाम विभागाला कळविले
जिल्हा परिषदेचे असलेले जवाहरलाल नेहरू वस्तीगृहामधील थकीत गाळेधारकांची वसुली लवकरात लवकर करण्यातबाबत बांधकाम विभागाला सांगितले आहे. जिल्हा परिषदेने या गाळेधारकांकडे 2013 साली करार केला होता. त्या कराराची अमंलबजावणी होताना दिसत नाही.
शिवानंद पाटील, उपाध्यक्ष जिल्हा परिषद
जवाहरलाल नेहरू गाळे धारकांकडे थकीत असलेली रक्कम
मंत्रीचंडक डेव्हलपर्स 3 लाख 6 हजार 498 रूपये
पास्ट ऑफ्ढाrस 5 लाख 20 हजार 550 रूपये
श्री कौशिक शहा 1 लाख 71 हजार 923 रूपये
श्री रवि सिंधी 2 लाख 88 हजार 789 रूपये
संदिप पोपटलाल गांधी 1 लाख 44 हजार 619 रूपये
मनोहर विश्वनाथ लोमटे 41 हजार 673 रूपये
श्री शाम क्षीरसागर 2 लाख 1 हजार 708 रूपये
जनसेवा क्षीरसागर 3 लाख 11 हजार 134 रूपये
बी. आर. म्हमाणे 3 लाख 6 हजार 762 रूपये
विजय-प्रताप युवा मंच 5 लाख 73 हजार 461 रूपये
एकूण 28 लाख 67 हजार 117 रूपये थकीत आहेत.