|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा राज्य चित्रपट पुरस्कार 24 एप्रिलरोजी

गोवा राज्य चित्रपट पुरस्कार 24 एप्रिलरोजी 

प्रतिनिधी/ पणजी

माहिती आणि प्रसिद्धी खाते व गोवा मनोरंजन संस्था यांच्यातफ्xढ दोनवर्षातून आयोजित ‘9वा गोवा राज्य चित्रपट पुरस्कार’ कोकणी चित्रपट दिनानिमित्ताने मंगळवार दि. 24 एप्रिल रोजी होणार आहे. गोवा राज्य चित्रपट महोत्सव शनिवार दि. 21 रोजी होणार असून सलग चार दिवस यात सहभागी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी 25 मार्चपर्यंत अर्ज भरावा असे आवाहन गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संदीप कुंडईकर, मृणाल वाळके आणि प्रकाश नाईक यांची उपसिथती होती. यात 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2017 दरम्यान प्रद†िर्शत झालेल्या चित्रपटांनाच अर्ज भरता येईल तसेच सेन्सर बोर्डची परवानगी असणे आवश्यक आहे. प्रत्येक चित्रपटात इंग्रजी सबटायटल असले पाहिजे. फ्ढिचर फ्ढिल्ममध्ये कोकणी आणि मराठी अशा दोन्ही भाषेतील चित्रपटाला प्रत्येकी एक तर vee@ve फ्ढिचर फ्ढिल्ममध्ये कोकणी, मराठी भाषेत मिळून एका चित्रपटाला पुरस्कार देण्यात येईल.

फ्ढिचर फ्ढिल्मचा वेळ कमीतकमी 70 मीनिट तर vee@ve फ्ढिचर फ्ढिल्मची वेळ पाच मिनीटाची असणे बंधनकारक आहे. चित्रपटात 15 टक्के कलाकार, 18 टक्के टेक्निशियन हे गोमंतकीय असले पाहिजे किंवा 15 वर्षे गोव्यात राहणारे असले पाहिजे. याचे अर्ज www.esg.co.in या वॅबसाईटवर उपलब्ध आहेत.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाला 5 लाख प्रथम व 3 लाख द्वितीय बक्षिस तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, साहाय्यक अभिनेता इ. 19 पुरस्कार वैयक्तिक पातळीवर देण्यात येईल. त्याची रक्कम 25,000 ते 50,000 रुपयांपर्यंत असणार आहे.