|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » एअरटेलचा धमाकेदार प्लॅन लाँच

एअरटेलचा धमाकेदार प्लॅन लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने त्यांचा नवा प्लॅन लाँच केला आहे. एअरटेलने 995 रूपयांमध्ये नवा प्लॅन आणला आहे. हा एअरटेलचा नवा प्लॅन केवळ प्रीपेड युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे,

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग सोबत रोमिंग कॉलदेखील मोफत मिळणार आहेत. एअरटेलच्या या स्पेशल रिचार्ज पॅकमध्ये 100मेसेज मिळणार आहेत. ग्राहकांना 180दिवसांसाठी 6 जीबी डाटा मोफत मिळणार आहे. मात्र ग्राहक एका महिन्यात 1 जीबीहून अधिक डाटा वापरू शकणार नाही. एअरटेल इंडियाचा हा प्लॅन सर्वत्र उपलब्ध करण्यात आले आहे.