|Monday, December 10, 2018
You are here: Home » Automobiles » हार्ले डेविडसनच्या दोन दमदार बाईक्स बाजारात

हार्ले डेविडसनच्या दोन दमदार बाईक्स बाजारात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अमेरिकन कंपनी हर्ले डेविडसन बाईक कंपनीने बुधवारी आपल्या दोन नव्या बाईक्स बाजारात लाँच केल्या आहेत. या बाईन्स नाव सॉफ्टेल डीलक्स आणि लो रायडर आहे.

कंपनीने याआधी भारतात फॅट बॉय या बाईकचे ऍनिव्हर्सरी एडीशन लाँच केले आहे. या बाईकची एक्स -शोरूम किंमत 19.71लाख रूपये इतकी आहे.भारतात नव्या Harley Davidson Softail Deluxe बाईकला लाईनअपमध्ये Fat Bob आणि Fat Boy यांच्यात रिप्लेस केलं जाईल.  हार्ली डेविडसन खासकरून क्रूजर बाईक आवडणा-या तरूणांवर लक्ष केंद्रीत करत आहे. सॉफ्टेल डीलक्स बाईकमध्ये कंपनीने पूल बॅक हॅंडलबार, क्रोम व्हिल्स, एलईडी हेडलाईट, डे-टाईम रनिंग लाईट, कीलेस इग्निशन, एबीएस इत्यादी फीचर्स दिले आहेत. 

                                       

 

 

Related posts: