|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » गुगलचे डूडलही होळीच्या रंगात रंगले

गुगलचे डूडलही होळीच्या रंगात रंगले 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशभरात होळी व धुळवडीचा उत्साह पहायला मिळत आहे. गुगलनेही होळी निमित्त आनोखे डूडल तयार करून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यामुळे गुगलचे डूडलही होळीच्या रंगात रंगलेले पहायला मिळत आहे.

विविध रंगामध्ये नटलेलं हे आकर्षक डुडल होळी आणि धुळवडीचा उत्साह द्विगुणीत करणार आहे. ढोल वाजवणारी, पिचकारी उडवणारी, रंगांची उधळण करणारी विविध माणसं या डुडलमध्ये दिसतात. या डुडलवर क्लिक केल्यावर होळी या सणाविषयी सगळी माहिती जगभरातील नागरिकांना वाचता येऊ शकते. रंगांच्या या उत्सवात गुगल डुडलही न्हाऊन निघालेलं पहायला मिळत आहे.