|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेंगुर्ल्यात आगीत दीड लाखाची हानी

वेंगुर्ल्यात आगीत दीड लाखाची हानी 

आंबा, काजू कलमांसह शेतमांगरही जळला

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

वेंगुर्ले निमुसगा सडय़ावरील अनुप गावडे यांच्या आंबा, काजू बागेस व शेतमांगरास शुक्रवारी दुपारी आग लागून लागती आंबा, काजू कलमे व शेतमांगर जळून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर आग लावल्याची तक्रार गावडे यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.

शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास निमुसगा येथील गावडे यांच्या आंबा बागेस आग लागली. आगीचे वृत्त समजताच स्थानिक ग्रामस्थ गणपत गावडे, विजय गावडे, वैभव गावडे, उदय राऊत, छोटू वेंगुर्लेकर, कृष्णा गावकर यांनी घटनास्थळी धाव धेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. न. प. चा अग्निशमन बंबही बोलावण्यात आला. बंडय़ा आरेकर, हेमंत चव्हाण, पंकज पाटणकर, दिनेश वेंगुर्लेकर, किशोर जाधव, आशिष जाधव आदी न. प. च्या कर्मचाऱयांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

या आगीत गावडे यांची आंब्याची 50 व काजूची 25 कलमे बेचिराख झाली. तसेच शेतमांगराचेही नुकसान झाले. सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याचे गावडे यांनी सांगितले. नगरसेवक नागेश गावडे, संदेश निकम यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.