|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्गमधील लाकूड व्यापाऱयास लुबाडले

दोडामार्गमधील लाकूड व्यापाऱयास लुबाडले 

वार्ताहर / दोडामार्ग:

दोडामार्ग तालुक्यातील एका लाकूड व्यापाऱयाला बंदुकीचा धाक दाखवून गोव्यातील एका टोळीने लुबाडल्याचा प्रकार नुकताच घडला. याबाबत दोडामार्ग पोलिसांत तक्रार दाखल नसली, तरीसुद्धा दोडामार्ग शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

दोडामार्ग तालुक्याला लागूनच असलेल्या गोवा राज्यात मोठय़ा प्रमाणात उद्योग धंदे सुरू आहेत. अनेक कारखानदारांना जळावू लाकूड मोठय़ा प्रमाणावर लागत असल्याने दोडामार्ग तालुक्यातून त्यासाठी मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील सदर लाकूड व्यापारी गोव्यात जळावू लाकडाची ट्रिप घेऊन गेला होता. गोव्यातील शिरोडा बोरी पुलाजवळ सदर व्यापारी पोहचला असता पाठीमागून येणाऱया चारचाकी वाहनाने ओव्हरटेक करीत सदर व्यापाऱयाचा टेम्पो थांबविला. टेम्पो चालक आणि मालक दोघांनाही आपल्या वाहनात बसण्यास सांगून बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील 22 हजार रुपयांची रोकड घेत सोडून देण्यात आले. याबाबत पोलिसात मात्र तक्रार दाखल नाही.

Related posts: