|Saturday, March 23, 2019
You are here: Home » उद्योग » जीएसटी : नफा कमाईविरोधात करता येणार सुलभपणे तक्रार

जीएसटी : नफा कमाईविरोधात करता येणार सुलभपणे तक्रार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जीएसटी दर कपात करत लाभ न देणाऱया व्यापाऱयांविरोधात कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहे. नफा कमाईविरोधातील प्राधिकरणाची निराशाजनक कामगिरी पाहता सरकारने सुधारणा करण्यासाठी पावले उचलण्यास प्रारंभ केला. यानुसार लवकरच नफा कमाई करणाऱयांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. यानुसार विक्रेत्याविरोधात तक्रार नोंदविणे सोपे जाणार आहे.

सामान्य व्यक्तीलाही नफा कमाईविरोधात तक्रार करता येईल. या अर्जावर तक्रारदाराला उत्पादनाचे नाव व विक्रेत्याचा जीएसटी क्रमांक द्यावा लागणार आहे. यानंतर तपास करण्याची जबाबदारी सरकारची असेल. तक्रार करण्यासाठी अर्ज प्राधिकरणाकडे मिळणार आहे. जीएसटी लागू झाल्यानतंर नफा कमाईविरोधात पावले उचलण्यास अपयश आले आहे. देशभरात 150 तक्रारी नोंदविण्यात आलेल्या आहेत. या तक्रारी केवळ दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांतून मिळाल्या आहेत. 

Related posts: