|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » विदेशींना लठ्ठ वेतनासाठी मुंबई दुसऱया स्थानी

विदेशींना लठ्ठ वेतनासाठी मुंबई दुसऱया स्थानी 

विदेशींना लठ्ठ पगारासाठी मुंबई दुसऱया क्रमांकावर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

व्यावसायिक क्षेत्रात लठ्ठ पगार देण्यासाठी अमेरिका आणि युरोपियन देश समजले जातात. मात्र देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱया मुंबईने विदेशी नागरिकांना लठ्ठ पगार देण्यासाठी अनेक देशांना मागे टाकले. सध्या विदेशी नागरिकांना लठ्ठ पगार घेण्यासाठी मुंबईला प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे.

एचएसबीसी बँक इंटरनॅशनल लिमिटेडने केलेल्या सर्वेनुसार मुंबईमध्ये काम करण्यासाठी येणाऱया विदेशी नागरिकांना मोठय़ा प्रमाणात वेतन देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विदेशी नागरिकांना देण्यात येणाऱया पगाराच्या आकडय़ांच्या तुलनेत मुंबईत दुप्पट वेतन देण्यात येते. आशियामध्ये काम करणाऱया विदेशी नागरिकांना सामान्यपणे आर्थिक रुपाने मोठय़ा प्रमाणात मदत करण्यात येते. या यादीमध्ये विदेशी नागरिकांना अधिक वेतन देण्याबाबत आशियातील शांघाय, बीजिंग, जकार्ता, हाँगकाँग, इंग्लडमधील लंडन यांचा समावेश आहे.

अमेरिका आणि ब्रिटनमधील आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ लोक अन्य देशांत जाण्यास अग्रक्रम देतात. युरोपातील तंत्रज्ञान क्षेत्राचे केंद्र समजले जाणारे डबलिन विदेशी नागरिकांना रोजगार देण्यासाठी पहिल्या पाच शहरांमध्ये आहे. मात्र सरासरी वेतनाच्या बाबतीत खूपच मागे आहे असे अहवालात म्हणण्यात आले.

स्वित्झर्लंडला टाकले मागे

युरोपियन देशांकडून स्वित्झर्लंडची राजधानी बर्नला अगोदर पहिले स्थान देण्यात येत होते. मात्र आता मानांकनात घट झाली आहे. याव्यतिरिक्त या देशातील ज्युरिच आणि जीनिव्हा ही दोन शहरे पहिल्या पाच शहरांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या ठिकाणचे राहणीमान आणि जीवनमानचा खर्च अधिक आहे, मात्र 77 टक्के विदेशींच्या मते आपल्या घरापेक्षा त्यांना तिथे अधिक सुरक्षित वाटते.