|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राष्ट्रवादीचे संजय गांधी निराधार योजनेसाठी आंदोलन

राष्ट्रवादीचे संजय गांधी निराधार योजनेसाठी आंदोलन 

वार्ताहर/ बारामती

बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी संजय गांधी निराधार योजनेच्या अडीअडचणी बाबत तहसिलदार कचेरी येथे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर यांनी म्हणाले, संजय गांधी योजनेचे अनुदान दर महिन्याला मिळावे. पात्र लाभार्थींना 600 रु. ऐवजी 3400 रु अनुदान मिळावे, श्रवणबाळ योजना लाभार्थी वय 65 ऐवजी 60 करावे, लाभार्थी उत्पन्नाची अट 21 हजार ऐवजी वाढ करावी,

तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किरण (दादा) तावरे यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी तहसिलदार हनुमंत पाटील यांना पात्र लाभार्थी व प्रमुख पदाधिकाऱयांच्या हस्ते विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी इम्तियाजभाई शिकीलकर, कार्याध्यक्ष धनवान वदक, संदीप जगताप, राजेंद्र काटे, अनिल हिवरकर, लक्ष्मण गोफणे, वनिताताई बनकर, अनिता गायकवाड, शारदाताई खराडे, शितल बनकर, संगिता पाटोळे, राहुल वाबळे, अमर धुमाळ, तुषार कोकरे, राहुल कदम, बाळासो जाधव, किरण तावरे, डॉ.अनिल सोरटे, जगन्नाथ जगताप, दिलिपराव ढवाण, आदींसह अनेक पात्र लाभार्थी व प्रमुख आजी-माजी पदाधिकारी, महिला, युवक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.