|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उपमहापौर मधुश्री पुजारी यांचा रामदेव गल्ली वडगाव येथे सत्कार

उपमहापौर मधुश्री पुजारी यांचा रामदेव गल्ली वडगाव येथे सत्कार 

प्रतिनिधी / बेळगाव

नूतन उपमहापौर मधुश्री पुजारी यांचा रामदेव गल्ली, वडगाव येथील श्री सरस्वती महिला मंडळ, श्रीराम युवक मंडळ आणि गल्लीतील नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. मधुश्री पुजारी या गल्लीतील रहिवासी आहेत.

गुरुवारी पुजारी यांची उपमहापौरपदी निवड झाल्यानंतर सायंकाळी रामदेव गल्ली, वडगाव येथील श्रीराम मंदिरासमोर सत्काराचा कार्यक्रम पार पडला. सत्काराला उत्तर देताना नूतन उपमहापौरांनी यापुढेही सर्वांचे सहकार्य व पाठिंबा अपेक्षित असल्याचे सांगितले. गल्लीतील ज्ये÷ नागरिक गोपाळराव सूर्यवंशी यांनी अभिनंदनपर भाषणात बोलताना, यापुढेही यश मिळो, अशी सदिच्छा व्यक्त केली. श्री सरस्वती महिला मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वला पालकर यांनीही शुभेच्छापर विचार मांडले.

याप्रसंगी मंडळाच्या सरिता जाधव, जयश्री सूर्यवंशी, गीता वेर्णेकर, लक्ष्मी जाधव, वैष्णवी वेर्णेकर, माला व सुवर्णा वागुकर, सुजाता मनमाडकर, भारती भोसले, सुनीता मंडोळकर यांच्यासह श्रीराम युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि गल्लीतील नागरिक उपस्थित होते.