|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » यंदा सरासरी पाऊस पडणार ; हवामान खात्याचा अंदाज

यंदा सरासरी पाऊस पडणार ; हवामान खात्याचा अंदाज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

या वर्षी राज्यात सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. ला नीनाच्या प्रभावामुळे मान्सूनची स्थिती सुधारल्याचेही हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळणार आहे.

ला नीना कधी निर्माण होईल माहिती नाही,मात्र ते तसेच सुरू राहिले,तर ते भारतातील मान्सूनसाठी चांगले असेल,असे मत पुण्यातील इंडियन इन्स्टीटय़ुट ऑफ ट्रॉपिकल मेटारॉलॉजीमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आर.कृष्णन यांनी मांडले.शिवाय,येत्या काही महिन्यात ला नीना कमजोर झाला, तरी मान्सूनवरील प्रभाव सर्वसामन्य असणार आहे.