|Thursday, September 20, 2018
You are here: Home » Top News » स्पर्धा परीक्षेच्या तणावातून तरूणीची आत्महत्या

स्पर्धा परीक्षेच्या तणावातून तरूणीची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / पिंपरी

पिंपरी चिंचवडमध्ये एका तरूणीने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱया तरूणीचे नाव प्रिती जाधव असे असून, ती मुळ बीडची आहे.

प्रिती ही मागील दोन वर्षापासून चिंचवडच्या साई पूजा लेडीज हॉस्टेलमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असे. मात्र, ती स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या तणावात आली होती, असे तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत नमुद केले आहे. तिच्या सोबत इतर चार मुलीही राहत होत्या, आज सकाळी त्या सर्व कामावर गेल्यानंतर तिने गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी दीडच्या सुमारास एक मैत्रिण रूमच्या बाहेर आली तीने दरवाजा वाजवला मात्र, प्रिती दार उघडत नसल्याने तिने हॉस्टेलच्या मालकाला सांगितले. मालकाने रूमच्या खिडकीतून आत पाहिले असता, प्रितीने आत्महत्या केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

 

Related posts: