|Saturday, June 23, 2018
You are here: Home » Top News » गोव्यात शिवसेनेला खिंडार ;24 पदाधिकाऱयांचा राजीनामा

गोव्यात शिवसेनेला खिंडार ;24 पदाधिकाऱयांचा राजीनामा 

ऑनलाईन टीम / गोवा

गोव्यामध्ये शिवसेनेला मोठी खिंडार पडली आहे. शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांच्यासह 24 पदाधिकाऱयांनी पक्षाचा सामुहिक राजीनामा दिला आहे.

खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी गोव्याचा दौरा केला होता. यावेळी राऊत यांनी शिवसेनेचे उपराज्यप्रमुख आणि प्रवक्ते जितेश कामत यांना बढती देत, राज्यप्रमुख पदी विराजमान केले होते. त्याप्रसंगी शिवसेनेच्या कोणत्याही पत्रकार परिषदेत उपस्थित न राहिलेल्या माजी राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांची गच्छंती झाली.

“कामत यांच्या निवडीवेळी राऊत यांनी मला बाजूला का करण्यात आले, याचे स्पष्टीकरण दिले नाही. दोन दिवसांनी आपल्या हकालपट्टीचे वृत्त आल्याने आम्हाला धक्का बसला. असे शिवप्रसाद जोशी यांनी सांगितले. दरम्यान, नवीन राज्यप्रमुखांनी आतापर्यंत किती जणांना पक्षात आणले. याची माहिती देण्यात यावी, असेही ते यावेळी म्हणाले. गोव्यातील विविध ठिकाणच्या पदाधिकाऱयांनी आपले मते मांडत कामत व प्रभुदेसाई यांच्यावर टिका केली. याचबरोबर जोशी यांची हकालपट्टी केल्याच्या निषेधार्त 24 पदाधिकाऱयांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

 

Related posts: