|Thursday, July 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » ऑस्ट्रेलियात रंगणार पहिला मराठी फिल्म फेस्टिव्हल

ऑस्ट्रेलियात रंगणार पहिला मराठी फिल्म फेस्टिव्हल 

 पुणे / प्रतिनिधी :

 लास्ट मिनिट प्रोडक्शनच्या वतीने येत्या 9 ते 11 मार्च दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात पहिल्या ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे सदस्य अमित नेने यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

 नेने म्हणाले, ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील लिडो सिनेमा येथे हा महोत्सव होणार असून, येत्या 9 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता अभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. महोत्सवात ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘लोकमान्य’, ‘गुलाबजाम’, ‘सविता दामोदर परांजपे’ व ‘ती आणि इतर’ हे मराठी चित्रपट प्रेक्षकांना पाहता येतील.