|Saturday, March 23, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि. 4 ते 10 मार्च 2018

मेष

धनुराशीत मंगळाचा प्रवेश व सूर्य, नेपच्यून युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय याच आठवडय़ात घ्या. धावपळ व दगदग झाल्याने प्रकृतीची काळजी घ्या. संसारात आप्तेष्टांच्या मदतीला जावे लागेल. नोकरीमध्ये लक्षपूर्वक काम करा. धंद्यात खर्च वाढण्याची शक्मयता आहे. नवे काम मिळवता येईल. कोर्टाच्या कामात दुर्लक्ष करू नका, कला, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल.


वृषभ

धनुराशीत मंगळाचे राश्यांतर व बुध, शुक्र युती होत आहे. या सप्ताहात तुमचे वागणे, बोलणे यात नम्रता ठेवण्याची गरज आहे. प्रसंग गंभीर स्वरुप धारण करू शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. प्रति÷ा टिकवता येईल. संसारात आपसातील वाद वाढतील. कोर्टकेस करण्याचा विचार त्रासदायक ठरू शकतो. धंद्यात छोटी छोटी कामे घेऊन पैसा मिळवा. कला क्रीडा क्षेत्रात घरापासून दूर रहावे लागेल.


मिथुन

मिथुनेच्या सप्तमस्थानात मंगळ प्रवेश व सूर्य, नेपच्यून युती होत आहे. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कामाचे कौतुक  होईल. तुमच्या अधिकाराचा योग्य प्रकारे वापर करू शकाल. धंद्यात फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. कला, क्रीडा क्षेत्रात नवीन दर्जेदार परिचय होईल. कल्पनाशक्ती वाढेल. प्रवासात घाई करू  नका. परीक्षेत यश मिळेल.


कर्क

कर्क राशीच्या ष÷स्थानात मंगळ प्रवेश व बुध, शुक्र युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधकांच्या विरोधात तुम्हाला बोलताना कायद्याचे भान ठेवावयाचे आहे. तुमच्या प्रति÷sला ठेच पोहचवण्याचा प्रयत्न शनिवारी होऊ शकतो. संसारातील समस्या कमी होतील. धंद्यात  सुधारणा होईल. शेतकरी वर्गाला वेळच्या वेळी कामे करून कागदपत्रे सादर करण्याची गरज आहे. नोकरीत वरि÷ांना दुखवू नका.


सिंह

कोणताही महत्त्वाचा निर्णय सप्ताहाच्या सुरुवातीलाच घ्या. राजकीय- सामाजिक कार्यातील भेटी घेणे व चर्चा करणे याला वेळ लावू नका. संसारात किरकोळ मतभेद होतील. गुरुवार, शुक्रवार गुप्त कारवायांचा त्रास होईल. धंद्यात  लक्ष द्या. खर्च वाढेल. कामगारांना सांभाळून ठेवा. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. धावपळ वाढेल. पोटाची काळजी घ्या. शेअर्समध्ये अंदाज घेतांना विचार करा.


कन्या

धनुराशीत मंगळ प्रवेश करीत आहे. बुध, शुक्र युती होत आहे. मनावरील दडपण वाढेल. राग वाढेल. उत्साहाच्या भरात कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात एखादा निर्णय तुम्हाला त्रासदायक वाटू शकतो. तुमच्या आत्मविश्वासाला कुणी आव्हान देईल. तुम्ही कोणतेही कृत्य करताना सावध रहा. धंद्यात जम बसेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. वाटाघाटीत चर्चा सफल होईल. नोकरीत काम वाढेल.


तुळ

या सप्ताहात  तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील वाटाघाटीत तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. रविवारी तुमचा अंदाज चुकण्याची शक्मयता आहे. धनुराशीत मंगळ प्रवेश व सूर्य नेपच्यून युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात याच आठवडय़ात तुम्ही तुमचे मुद्दे वरि÷ांना पटवून द्या. कामात यश मिळेल. मान प्रति÷ा मिळेल. कला क्रीडा क्षेत्रात स्पर्धा फारच कठीण असेल. धंद्यात हिशोब नीट करा.

वृश्चिक

सप्ताहाच्या सुरुवातीला धावपळ वाढेल. राग वाढणारी घटना घडू शकते. संसारात किरकोळ मतभेद होतील. धनुराशीत मंगळ प्रवेश व बुध,शुक्र युती होत आहे. धंद्यात अंदाज घेतांना जास्त आत्मविश्वास नुकसानकारक ठरू शकतो. डोक्मयाची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तणाव होईल. विरोधक तुमच्यावर आरोप करतील. परिस्थिती सावरुन घेता येऊ शकते. विद्यार्थीवर्गाने जास्त मेहनत घ्यावी.


धनु

तुमच्याच राशीत मंगळ प्रवेश व सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. बुधवार नंतर तुमच्या कार्यात किरकोळ अडचणी येतील. घरातील व्यक्तींचा  तुमच्यावर दबाव राहील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे विचार इतरांना पटवून देता येतील. नातलगांच्या सहवासात मन रमेल. कला क्रीडा क्षेत्रात नावलौकीक व लाभ मिळेल. परिक्षेसाठी चांगली तयारी करू शकाल. नवीन ओळखीने धंद्यात वाढ होऊ शकते. शेतकऱयांची समस्या कमी होईल.


मकर

या आठवडय़ात तुमच्या कार्यात तुम्हाला चांगले सहकार्य व यश मिळेल. शनिवारी रागावर नियंत्रण ठेवा. धनुराशीत मंगळ प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढेल. त्यामुळे विरोधक चडफडतील. अनुचित कार्य हातून होणार नाही. याची काळजी घ्या. संसारात शुभ समाचार मिळेल. चांगले मित्र मिळतील. जुने मित्र सहवासात येतील. कल्पनाशक्ती वाढेल. कला क्रीडा क्षेत्रात चमकाल.


कुंभ

धनुराशीत प्रवेश करणारा मंगळ तुमचे धैर्य वाढवणार आहे. रविवारी वादाला  जास्त महत्त्व देऊ नका. गुप्त शत्रू मुद्दाम  कारस्थाने करतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कामाचा विस्तार होईल. तुमच्यावर  जबाबदारी टाकली जाईल. प्रति÷ा वाढेल. तुमचे विचार सर्वांना पटतील. धंद्यात मोठे काम मिळेल. जम बसेल. फायदा वाढेल. शेअर्सचा अंदाज  बरोबर होईल. नातलग, मित्र यांचा सहवास मिळेल. परिक्षेत यश मिळेल. प्रगतीची नवी संधी मिळेल.


मीन

प्रगतीची मोठी संधी समोर दिसेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कुठेही उतावळेपणा करू नका. संयमाने सर्व संधींचा उपयोग करून घ्या. एकाच वेळी अनेक गोष्टी करताना बेसावधपणा होण्याची शक्मयता असते. राजकीय, सामाजिक कार्यात नम्रता ठेवा. मैत्रीपूर्ण संबंध वाढतील. प्रेमात जास्त वाहवत जाऊ नका. संसारात आनंदी वातावरण राहील. धंदा वाढेल, खर्चावर नियंत्रण ठेवा. कोर्टाच्या कामात  लक्ष द्या. विद्यार्थीवर्गाने जास्त अभ्यास करावा.

 

Related posts: