|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » leadingnews » ‘ईशान्य भारत हा देशाच्या विकासाचे नेत्तृत्व करेल’ – नरेंद्र मोदी

‘ईशान्य भारत हा देशाच्या विकासाचे नेत्तृत्व करेल’ – नरेंद्र मोदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

   त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशानंतर ‘ईशान्य भारत’ हा देशाच्या विकासाचे नेत्तृत्व करेल.’ असे म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी भाजप मुख्यालयातून जनतेला संबोधित केले.

   त्रिपुरातील भाजपाच्या विजयानंतर  मोदी म्हणाले, आजच्या डाव्यांच्या टिकांनी मी परेशान झालो आहे. त्रिपुरात आम्ही शुन्यातून शिखरापर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे सूर्य मावळतो तेव्हा तो लाल होतो, उगवतो तेव्हा केशरी रंगाचा दिसतो, अशा शब्दांत मोदी यांनी डाव्यांच्या टिकेवर उत्तर देताना त्यांना चांगलाच टोला लगावला. ‘ईशान्य भारत हा देशाच्या विकासाचे नेत्तृत्व करेल.’ जनतेनी त्यांच्यावर झालेल्या हिंसेचे उत्तर मतदानातून दिले आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या बलिदानाचे जेवढे दुःख आम्हाला झाले, तेवढेत त्रिपुराच्या जनतेलाही झाले. गेल्या सहा महिन्यात भाजपाच्या तब्बल 24 कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. विजयाप्रमाणे पराभवही स्विकारता आला पाहिजे, पराभवाविषयी खेळाडू वृत्ती असणे आवश्यक आहे. हीच लोकशाहीची नीती आहे. असे म्हणत मोदींनी विरोधकांना धारेवर धरले. काल होळी निमित्त देश अनेक रंगात रंगला होता. मात्र, आजच्या विजयानंतर देश केशरी रंगात रंगला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

   अमित शहा म्हणाले, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील दिग्वजियाचा रथ त्रिपुराहून कर्नाटककडे निघाला आहे. भाजपाचा हा विजय मोदींनी केलेल्या विकासामुळे झाला आहे. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तिन्ही राज्याच्या लोकांनी मोदींना स्विकारले असून मोदीच्या विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. या राज्यांमध्ये पूर्वीच्या सरकारकडून विकासाच्या नावाने फक्त जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. मोरारजी देसाई नंतर नॉर्थ-इस्ट राज्यांच्या विकासाचा विचार करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम विकासाकडे लक्ष देवू. असेही त्यांनी सांगितले.

   विजयी सभेवेळी भाजपाध्यक्ष अमित शहा उपस्थित आहेत. नरेंद्र मोदींनी भाषणाला सुरूवात करताच  नमाजापूर्वीची अजान सुरू झाली असता, अजान संपेपर्यंत मोदी हे दोन मिनिटे भाषण न करता शांत उभे होते. ज्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिले त्यांना सर्वप्रथम श्रद्धांजली ही वाहिली.

 

 

Related posts: