|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कोमसाप जिल्हा अध्यक्षपदी मंगेश मसके

कोमसाप जिल्हा अध्यक्षपदी मंगेश मसके 

नूतन कार्यकारिणीची निवड

प्रतिनिधी / कुडाळ :

 कोकण मराठी साहित्य परिषद (सिंधुदुर्ग)च्या सर्वसाधारण सभेत मंगेश मसके यांची पुढील तीन वर्षांसाठी अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. या सभेचे निरीक्षक म्हणून गजानन म्हात्रे (मुंबई) यांनी काम पाहिले.

 उर्वरित कार्यकारिणी- जिल्हा समन्वयक रुजारिओ पिंटो (मालवण), कार्यवाह भरत गावडे (सावंतवाडी), सहकार्यवाह विठ्ठल कदम (सावंतवाडी), खजिनदार प्रा. अरुण मर्गज (कुडाळ), सदस्य सुरेश ठाकुर (मालवण), सुभाष गोवेकर (सावंतवाडी), उषा परब (सावंतवाडी), वृंदा कांबळी (कुडाळ), संजीवनी फडके (देवगड), प्रा. राजेंद्र हिंदळेकर (देवगड), सामाजिक कार्य प्रतिनिधी रणजीत देसाई (कुडाळ), ग्रामीण भाग प्रतिनिधी विजय पालकर (माणगाव), पत्रकार प्रतिनिधी अर्जुन राणे (कुडाळ), कायदेविषयक सल्लागार ऍड. अमोल सामंत (कुडाळ), लेखा परीक्षक अजित फाटक (कुडाळ), जिल्हा ग्रंथालय संघ प्रतिनिधी अनंत वैद्य (कुडाळ), जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर (ओरोस) व साहित्यिक प्रतिनिधी मधुसुदन नानिवडेकर (कणकवली) यांची निवड करण्यात आली.

 मसके यांच्या निवडीबद्दल ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, डॉ. महेश केळुसकर यांच्यासह जिल्हय़ातील साहित्यिकांनी त्यांचे अभिनंदन केले. कोमसाप ही साहित्यिक चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत नेणारी संस्था आहे. बालसाहित्य चळवळ शाळांमध्ये जाऊन रुजविण्यासाठी सर्व साहित्यिकांनी काम करणे गरजेचे आहे. नूतन कार्यकारिणी जिल्हय़ातील साहित्य चळवळीमार्फत साहित्य संमेलने, बालसाहित्य संमेलने, पुस्तक प्रकाशन, नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ, जुन्याजाणत्या साहित्यिकांचा सन्मान व कवी संमेलने असे कार्यक्रम राबविणार असल्याचे नूतन अध्यक्ष मसके यांनी सांगितले.