|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी योगेश मुळीक निश्चित

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी योगेश मुळीक निश्चित 

ऑनलाईन टीम / पुणे

आमदार जगदीश मुळीक यांचे भाऊ योगेश मुळीक यांची पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीवेळी निर्माण झालेल्या गोंधळामुळे यावेळी थेट मंत्री महादेव जानकर स्वतः पत्र घेऊन आले. योगेश मुळीक यांची नगरसेवकपदाची ही दुसरी वेळ आहे.

आगामी विधानसभा निवडणुक लक्षात घेत वडगावशेरी भागात पक्षाला मजबूत करण्यासाठी मुळीक यांच्या नावाचा विचार पक्षाने केला, असे बोलले जात आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या चर्चेत अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधु सुनील कांबळे, भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई रंजना टिळेकर यांची नावे होती. पण, योगेश मुळीक यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांची निवड निश्चित असल्याचे मानली जात असून, ही निवडणुक 7 मार्च ला होणार आहे. पुणे महानगर पालिकेत भाजपचे वर्चस्व असल्याने स्थायी अध्यक्षपदाची निवडणुक फक्त नाममात्र राहणार आहे. या निवडणुकीत पुण्यातील तीन आमदारांनी घरात अध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यात योगेश मुळीक यांच्या वर्णी लागली. यामुळे मुळीक यांच्या निवडीमागे पालकमंत्री गिरीश बापट यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले.

 

Related posts: