|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » बापानेच केला सात महिण्याच्या चिमुरडीचा खून

बापानेच केला सात महिण्याच्या चिमुरडीचा खून 

ऑनलाईन टीम / न्हावरे

 आपली मुलगी नसल्याचा संशयावरून बापाने आपल्या सात महिन्यांच्या मुलीचा शस्त्राने गळा कापून खून केल्याची धक्कादायक घटना कुरूळी येथे शुक्रवारी घडली.

मृत चिमुरडीचे नाव कौशल्या भुरा धुळकर (वय 7 महिने) असे असून, तिचे पिता भुरा शंकर धुळकर (वय 30) याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मुलीचा खून करून ती बेपत्ता असल्याच्या करणावरून नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, भुरा धुळकर व त्याची पत्नी अरूणा धुळकर हे केडगाव येथील कुरूळी येथे ऊसतोडणीचे काम करत होते. भुरा धुळकर याला चार वर्षांचा एक मुलगा व सात महिन्यांची एक मुलगी होती. कौशल्या गुरूवारी रात्री आपल्या आईवडिलांसोबत झोपली होती. दरम्यान शुक्रवारी सकाळी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी भुरा धुळकर मांडवगण फराटा येथील पोलीस स्थानकात आला. त्याची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली. धुळकर याची तक्रार नोंदवून घेत असतानाच आंधळगावच्या शिवारातील एका विहिरीत सात महिन्यांच्या मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता तो मृतदेह बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आलेल्या मुलीचा असल्याचे समोर आले. भांडन झाल्याने भुराची याची बायको काही दिवस माहेरी गेली होती. मृत कौशल्या ही त्याची मुलगी नसल्याचा संशय भुराला होता. या संशयापोटी बुधवारी मध्यरात्रीला मुलीला झोपेतून उठून स्वतःजवळ असणाऱया धारदार चाकूने त्यांच्या पोटच्या चिमुरडीचा गळा कापून त्याने तिचा खून केला. यावेळी पत्नीने मुलीला मारू नका, अशी विनवनी केली असता, तिला झिडकारून देवून तुलाही मारून टाकेल, अशी धमकी देऊन मुलीचा मृतदेह विहिरीत आरोपीने फेकून दिला.

 

Related posts: