|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » मध्य-उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात गारपिटीचे संकेत

मध्य-उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात गारपिटीचे संकेत 

ऑनलाईन टीम / मुबई

मध्य-उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात बुधवारी गारपीट होण्याचे संकेत हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱयांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दक्षिणपूर्व अरबी समुद्रात केरळ ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याच्या प्रभावामुळे येणाऱया बुधवारी म्हणजेच सात मार्चला मध्य- उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात विजांच्या गडगडाटासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या महिन्यात 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान मराठवाडा, विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड परिसरात मोठय़ा प्रमाणात गारपीट झाली होती. यामध्ये राज्यातील शेतकऱयांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा अरबी समुद्राकडून येणारे वारे आणि उत्तरेकडून येणाऱया या वाऱयांमध्ये मध्य- उत्तर महाराष्ट्र, विदर्भ तसेच पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश या भागात बुधवारी गर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

Related posts: