|Monday, December 10, 2018
You are here: Home » Top News » देशाच्या फाळणीला जिना नाही, पटेल-नेहरू जवाबदार; अब्दुल्ला

देशाच्या फाळणीला जिना नाही, पटेल-नेहरू जवाबदार; अब्दुल्ला 

ऑनलाईन टीम / श्रीनगर

जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्प्रेंसचे जेष्ठ नेते फारूक अब्दुल्ला यांनी भारत-पाकिस्तान फाळणीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘मोहम्मद अली जिना यांच्यामुळे नाही तर सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, आणि मौलाना आझाद देशाच्या फाळणीला जबाबदार आहेत.’ असा खळबळजनक आरोप यांनी केला आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे भारताच्या विभाजनामुळे पाकिस्तानचा जन्म झाला, असे अब्दुल्ला म्हणाले. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी मोहम्मद अली जिना आग्रही नव्हते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेगळे मुस्लिम राष्ट्र तयार करण्याचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा एका आयोगाची स्थापना करण्यात आली. देशाची फाळणी करण्याएवजी मुस्लिमांसाठी वेगळे नेतृत्त्व असेल असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तसेच अल्पसंख्य आणि शिख यांच्यासाठी वेगळी यंत्रणा असेल, असेही समितीने म्हटले होते. मोहम्मद अली जिना यांना हा प्रस्ताव मंजूर होता. मात्र, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार पटेल या तिघांनाही हा प्रस्ताव धुडकावला. त्यानंतर जिना यांनी पाकिस्तानची मागणी केली, असं अब्दुल्ला म्हणाले. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, आणि मौलाना आझाद या तिन्ही वरि÷ नेत्यांनी निर्णय घेण्यात मोठी चूक केली नसती, तर देशाची फाळणी झाली नसती असेही अब्दुल्ला म्हणाले. त्यावेळी जी तिरस्काराची बीज रोवली गेलीत, मात्र त्याची किंमत आजही देशाला भरावी लागत आहे. धर्म, जात आणि क्षेत्र यांच्या आधारावर आपण कधीपर्यंत लोकांमध्ये फूट पाडत राहणार? असा सवालही फारूक अब्दुल्लांनी उपस्थित केला.

 

Related posts: