|Monday, December 10, 2018
You are here: Home » विविधा » पुण्यातील ‘या’ चहावाल्याची कमाई ऐकून व्हाल थक्क

पुण्यातील ‘या’ चहावाल्याची कमाई ऐकून व्हाल थक्क 

ऑनलाईन टीम / पुणे

2014 सालच्या लोकसभा निवडणुकीपासून संपुर्ण देशभरात ‘चायवाला’ हा शब्द चांगलाच गाजलेला पहायला मिळाला आहे. पुण्यातील असाच एक चहावाला सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या महिन्यातील कमाईमुळे हा चहावाला चर्चेत असून या चहा विपेत्याची कमाई ऐकून तुम्हा थक्क व्हाल. कारण हा चहाविपेता महिन्याला जवळपास बारा लाख रूपये कमावत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ येवले असे या चहा विकनाऱया व्यक्तीचे नाव असून तो महिन्याभरात बारा लाख रूपयांची कमाई करतो. ‘येवले टी हाऊस’ हे ठिकाण पुण्यातील काही लोकप्रिय चहा स्टॉल्सपैकी एक आहे. पुण्यामध्ये ‘येवले टी हाऊस’ चे तीन सेंटर असून प्रत्येक सेंटरवर जवळपास बारा लोक काम करतात अशी माहिती आहे. मिळवलेल्या या यशामुळे नवनाथ येवले उत्साहीत आहेत, भविष्यात या चहाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करायची इच्छा असल्याचे यावेळी येवले म्हणाले.

 

Related posts: