|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » छगन भुजबळ जे.जे. रूग्णालयात दाखल

छगन भुजबळ जे.जे. रूग्णालयात दाखल 

ऑनलाईन टीम / मुंबई

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्थमा आणि पोटदुखीच्या त्रासामुळे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मार्च 2016 पासून महाराष्ट्र सदन घोटाळय़ासह बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपाखाली भुजबळ व त्यांचे पुतणे समीर दोन वर्षापासून तुरूंगात आहेत. ईडीमार्फत तपासाचा भाग म्हणून त्यांच्या मालमत्ता तपासणीपासून जप्तीपर्यंत कारवाई करण्यात आली आहे. तुरूंगात असलेले भुजबळ यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Related posts: