|Thursday, July 18, 2019
You are here: Home » leadingnews » अमित शहा आज नागपूरात ; सरसंचालकांची घेणार भेट

अमित शहा आज नागपूरात ; सरसंचालकांची घेणार भेट 

ऑनलाईन टीम / नागपूर

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे रविवारी संघभूमीत आगमन झाले. यावेळी ते संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह इतर संघ पदाधिकाऱयांची भेट घेणार आहेत.

त्रिपुरामधील विजयानंतर दुसऱयाच दिवशी शहा नागपुरात येणार असल्याने राजकीय वर्तुळाचे या भेटीकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पुढील आठवडय़ात संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभादेखील सुरू होणार आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला 9 मार्चपासून रेशीमबाग येथे सुरूवात होत आहे. या निमित्ताने संघाचे अनेक जेष्ठ पदाधिकारी नागपुरातच दाखल झाले आहेत. त्रिपुरात भाजपाच्या विजयामुळे संघ मुख्यालयातदेखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मेघालयमध्ये कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. काँग्रेस तेथे सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी त्रिशंकू परिस्थितीमुळे तेथे सत्तास्थापनेसाठी भाजपचा पूर्ण प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर शहा यांची भेट महत्त्वाची मानल्या जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शहा यांचे रविवारी दुपारी 12 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.सुधाकर कोहळे, आ.कृष्णा खोपडे, महापौर नंदा जिचकार यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.