|Saturday, April 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » गायिका शरयू दाते जोपासतेय चित्रकलेची आवड

गायिका शरयू दाते जोपासतेय चित्रकलेची आवड 

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच यातील सेलेब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. लोकसंगीत असो, शास्त्राrय संगीत असो वा वेस्टर्न संगीत असो या गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये पॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. या स्पर्धकांमधीलच एक जिने आपल्या सुमधुर गायकीने, सुरांनी प्रेक्षकांना आपलेसे केले आहे अशी सगळय़ांचीच लाडकी शरयू दाते ही गाण्याबरोबरच उत्तम चित्र देखील काढते. ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रक्षेपित झालेल्या भागामध्ये शरयूने भारतरत्न लतादीदी यांचे काढलेले एक सुंदर स्केच प्रेक्षकांना दाखवले. इतकेच नव्हे तर याव्यतिरिक्त देखील तिने तिच्या गुरू आरती अंकलीकर यांचे स्केच देखील काढले आहे.

शरयूला चित्रकला खूप आवडत असून तिने त्याच्या संबंधीतील परीक्षेमध्ये अ श्रेणी मिळवली आहे. गाण्याबरोबरच मला चित्रकला, स्केच काढायला खूप आवडते. मला जसा वेळ मिळेल तसं मी चित्र काढते. सध्या वेळेच्या अभावी मला तितकासा वेळ नाही देता येते. पण, माझा नेहमीच प्रयत्न असतो वेळ देण्याचा, असे शरयू म्हणाली. शरयूने सूर नवा कार्यक्रमामध्ये अनेक सुंदर गाणी गाऊन पॅप्टनसची आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Related posts: