|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवप्रति÷ानच्यावतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी

शिवप्रति÷ानच्यावतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी 

बेळगाव / प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदूंना अभिमानाने जगण्यासाठी बरेच पराक्रम गाजविले. सहय़ाद्रीच्या दऱया-खोऱयांतून किल्ले उभे करून परकियांना नेस्तनाबूत करून हिंदू धर्माचे रक्षण केले. अशा राजाची जयंती तिथीनुसार व्हायला पाहिजे, असे मत शिवप्रति÷ानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी व्यक्त केले.

श्री शिवप्रति÷ान हिंदुस्थान यांच्यावतीने हिंदू तिथीनुसार (फाल्गुन वद्य तृतीया) शिवजयंती रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी उद्यान येथे महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला. ध्येयमंत्र म्हणून विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी महिलावर्गाने शिवरायांचे पाळणागीत गायिले. तसेच प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी शहर अध्यक्ष अजित जाधव, कार्याध्यक्ष विश्वनाथ पाटील, अनंत चौगुले, चंद्रकांत चौगुले, प्रमोद कंग्राळकर, अमोल केसरकर, किरण बडवाण्णाचे, शंकर भातकांडे, अर्जुनराव गौंडाडकर, उमेश ताशिलदार, शिरामणी मुचंडीकर, गणेश जांगळे, अभिजीत अष्टेकर, गजानन पाटील, अंकुश केसरकर, गजानन निलजकर, सागर पवार, विजय कुंटे, व्यंकटेश पाटील, उमेश बिर्जे, मंगेश हारेर, आदित्य कोवाडकर, राजू शेट्टी उपस्थित होते. प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.