|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » पर्रिकर पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाणार ?

पर्रिकर पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाणार ? 

ऑनलाईन टीम / पणजी

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर स्वादूपिंडाच्या आजारावरील उपचारासाठी आज परत मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना डीहायड्रेशन आणि ब्लड प्रेशरचा त्रास जाणवू लागल्याने गोवा येथील मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लीलावती रूग्णालयात दाखल झाल्यानंतर पर्रिकर हे तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोवा मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, पर्रिकर हे आपल्या घरातूनच कामकाज पाहत असत. त्यांनी काही महत्त्वाच्या फाईल्स हय़ा घरातूनच क्लिअर केल्या आहेत. आज पर्रिकर मुंबईला रवाना होण्यापूर्वी प्रशासकीय कामे पूर्ण करणार अस, भाजपांच्या आमदारांशी चर्चा करणार असल्याची शक्यता आहे. आपल्या गैरहजेरीमध्ये कोणतीही कामे अपूर्ण राहू नये, म्हणून प्रत्येक मंत्र्याला 50 लाखांपर्यंतचा निधी खर्च करण्याची परवानगी त्यांनी दिली असल्याची माहिती समोर येत आहे.

या अगोदर पर्रिकरांना स्वादुपिंडाच्या विकारामुळे मुंबईतील लीलावती रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी ते 22 तारखेला खास विमानाने मुंबईतून गोव्याला गेले. त्यानंतर त्यांनी थेट विधानसभा गाठली आणि अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ते दोनापावला येथील आपल्या खासगी घरातून कामकाज पाहत होते. इंनफेक्शन होवू नये म्हणून त्यांना बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्यांना डिहायड्रेशन आणि ब्लड प्रेशरचा त्रास होवू लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले.