|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Automobiles » रेनो डस्टरच्या किमतीत मोठी कपात

रेनो डस्टरच्या किमतीत मोठी कपात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध कार निर्माती कंपनी असलेल्या रेनोने आपल्या डस्टर गाडीच्या किमतीत मोठी कपात केली आहे. या गाडीच्या पेट्रोल व्हेरिएंटच्या किमतीत 36 हजार रूपयांपासून ते 56 हजार रूपयांपर्यंत कपात केली आहे. तर, डिझेल व्हेरिएंटच्या किमतीत 50हजार रूपयांपासून ते 1 लाख रूपयांपर्यंत कपात केली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनूसार, रेनो डस्टर गाडीचे उत्पादन नव्या स्तरावर सुरू करण्यात आले आह s.गाडीच्या किमतीत करण्यात आलेल्या कपातीचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे. रेनो डस्टरच्या पेट्रोल रेंजची सुरूवात किंमत 7.95लाख रूपये ठेवण्यात आली आहे.तर डिझेल व्हेरिएंटची सुरूवात किंमत 8.98लाख रुपये  इतकी आहे. रेनो डस्टरच्या RXZ ११० PS AWD या गाडीच्या किंमतीत सर्वाधिक कपात करण्यात आली आहे.या कारच्या किमतीत एक लाख रूपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

 

 

 

 

Related posts: