|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » विविधा » राज्यात उष्णतेची लाट

राज्यात उष्णतेची लाट 

ऑनलाईन टीम / नंदुरबार :

राज्यात सध्या उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. उष्णतेच्या झळांचा फटका राज्याच्या अनेक जिह्यात दिसू लागला आहे. नंदुरबारमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून गेल्या 48 तासांत नंदुरबारमध्ये सर्वाधिक 43.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच तापमानात अशी वाढ झालेल्याने पुढील दोन महिन्यात तापमन आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे उन्हाच्या झळा बसत असताना उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढच्या दोन दिवसात उत्तर महाराष्ट्रासह, विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावसाचा अंदाज आहे. मात्र या दोन दिवसात हवामानात काही बदल झाले,तर कदाचित गारपिटीचे संकट टळू शकेल,अशी महिती मिळाली आहे.