|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » अदानी गॅसची थेट समभाग विक्री

अदानी गॅसची थेट समभाग विक्री 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अदानी समूहातील उपकंपनी असणारी अदानी गॅसचा समभाग थेट सूचीबद्ध होणार आहे. अन्य कंपनीप्रमाणे प्राथमिक समभागांची विक्री करण्यात येणार नाही असे सांगण्यात आले आहे. जानेवारीत अदानी समूहाने वायू क्षेत्रातील वितरण आणि संशोधन व्यवसायाचे विलीनीकरण करत अदानी गॅस लिमिटेडची स्थापना केली होती. अदानी गॅसकडून उद्योग आणि घरगुती वापरासाठी पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) आणि वाहतुकीसाठी सीएनजीचा पुरवठा करण्यात येतो. देशात वायूचे वितरण करण्याच्या व्यवसायाला भविष्यात चांगल्या संधी असल्याने कंपनीकडून आक्रमक रणनीतिचा अवलंब करण्यात येत आहे.

कंपनीकडून थेट समभागांची विक्री करण्यात आल्याने ते आयपीओपेक्षा स्वस्त असणार आहेत. याव्यतिरिक्त कंपनीकडून नवीन समभागांची विक्री करण्यात येत नाही. गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा, हरियाणातील फरिदाबाद, उत्तरप्रदेशातील खुर्जामध्ये कंपनीकडून वितरण केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. कंपनीचा विस्तार सहा शहरांत असून 2021 पर्यंत 50 शहरांत पोहोचण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.