|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गुरूच्या मृत्यूने व्याकूळ झालेल्या शिष्याचीही आत्महत्या

गुरूच्या मृत्यूने व्याकूळ झालेल्या शिष्याचीही आत्महत्या 

प्रतिनिधी/ सातारा

महाभारतातील अश्वत्थामा, द्रोणाचार्य गुरू शिष्याच्या नात्याची आजही अनेक ठिकाणी दाखले दिले जातात. परंतु अलीकडच्या काळात गुरू शिष्याचे नाते कुठेच दिसून येत नाही. उलट कानामागून आला अन् तिखट झाला म्हणीप्रमाणे गुरूवार शिरजोरी करण्याचेच प्रकार दिसून येतात. मात्र, सकाळी आपले गुरू साईरंग महाराज (वय 68) हृदयविकाराच्या झटक्याने गेल्याचे समजताच त्यांचे बालपणापासून शिष्य असलेले गजानन बाबुराव घोडके (कारंजकर) वय 60 रा. बदामीविहिरीजवळ मंगळवार पेठ सातारा यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरू हेच माझे सर्वस्व या म्हणीप्रमाणे घर-कुटुंबिय यांची पर्वा न करता गुरूसाठी प्राणत्याग करणाऱया आगळय़ा वेगळय़ा शिष्याची साताऱयात दिवसभर चर्चा सुरू होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरू पांडुरंग शंकरराव भुजबळ तथा साईरंग महाराज हे साईबाबांचे भक्त असून गोडोली येथे असलेल्या साईमंदिराचे ते संस्थापक स्थापनेपासून पुजारी होते. तर गजानन घोडके हे लहानपासून साईबाबांची पुजा-अर्जा करीत ते करताना बालपणापासूनच त्यांच्या कोवळय़ा मनावर गुरू साईरंग महाराजांचे संस्कार झाले व बालवयातच मानलेल्या गुरूला आदर्शस्थानी ठेवत त्यांनी जीवनक्रम सुरू केला. जीवनातील कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना धार्मिक विधी करताना ते गुरूंची आज्ञा शिरसावद्य मानत. गुरू शिष्याचे हे नाते दिवसेंदिवस असेच बहरत गेले. शिष्य गजानन घोडके यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा व दोन मुली ही अपत्ये झाली. या तिघांनाही त्यांनी उच्चशिक्षित केले. मुलगा इंजिनिअर तर मुलगी वकील झाली. जावईही उच्चशिक्षित मिळाला. परंतु शिक्षित कुटुंब  वाढवताना  त्यांच्यावरील अध्यात्मिक, धार्मिक संस्कार कोठेही कमी पडणार नाहीत याची दखल त्यांनी घेतली.

रविवारी शिष्य असलेले गजानन घोडके हे कामानिमित्त पुणे येथे गेले होते.  तर रविवारी पांडुरंग शंकरराव भुजबळ यांचे वयाच्या 88 व्या वर्षी पहाटे सव्वातीन वाजता  हृदयविकाराने पुणे येथे निधन झाले. सोमवारी सकाळी गजानन  घोडके घरी आले असता आपले गुरू या जगात नाहीत हे समजताच त्यांना धक्का बसला.  या धक्क्यातून ते सावरलेच नाहीत. त्यांनी पत्नी, मुले, घर, कुटुंब   अशा कोणत्याच  गोष्टीचा विचार केला नाही. गुरूने  जग  सोडले आता या जगात  राहून मी काय करू? या भावनेने ते एवढे व्याकुळ झाले की त्यामध्येच  त्यांनी  सकाळी 10 वाजता राहत्या घरीच गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने कुटुंबिय, नातलग, दुखाच्या शोकसागरात बुडाले आहेत. हे जरी खरे असले तरी आजच्या या जमान्यात ही गुरू-शिष्य आहेत हेच या घटनेवरून जाणवते.

Related posts: