|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » गुगलद्वारे हे 14 ऍप्स् बंद

गुगलद्वारे हे 14 ऍप्स् बंद 

ऑनलाईन टीम / पुणे

स्मार्टफोनच्या माध्यमातून नको ते ऍप्लिकेशन वापरण्याची सवयच आपल्याला लागली आहे. एखादा बँकेचा व्यवहार करण्यापासून ते रस्ता शोधण्यापर्यंत आणि गाडी बुक करण्यापासून ते विकत घेण्यापर्यंत आयुष्यातील अनेक महत्त्वाची कामे यामुळे शक्मय झाली आहेत.

आता यातील अनेक कामे ही ऍप्लिकेशनच्या माध्यमातून केली जातात. आपल्याला कोणतेही ऍप्लिकेशन हवे असले की आपण सहजतेने गुगलच्या प्ले स्टोअरवर जातो आणि आपल्याला हवे असणारे ऍप्लिकेशन स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करतो. पण आता ही गोष्ट इतकी सहज राहीलेली नाही. कारण गुगलने ठराविक ऍप्लिकेशनवर बंदी आणलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण चौदा ऍप्लिकेशनवर गुगलने बंदी घातली आहे. यामध्ये  Amazon UnderGround, CM Installer, TV Portal, Popcorn Time,  Grooveshark,  PSX4Droid, Sarahah,  Lucky Patcher,  Rush Poker, Tube Mate, Viper4Android,  F-Droid, X posed Framework,  AdAway, या ऍप्लिकेशनचा समावेश आहे. यातील अनेक ऍप्लिकेशन ही सोशल मीडियाची असून काही गेम्सचीही आहेत. अशाप्रकारे अचानक इतकी ऍप्लिकेशन बंद करण्यामागे सुरक्षेचे कारण असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. या ऍप्लिकेशनचा नियमित वापर करणाऱयांमध्ये या बंदीमुळे नाराजीही व्यक्त केली जात असावी. ऑस्ट्रेलियातील एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर ऍपल आणि गुगलने आपल्या ऍप स्टोअरमधून साराह हे ऍप्लिकेशन काढून टाकले आहे. त्यामुळे यापुढे हे ऍप डाऊनलोड करता येणार नाही. याप्रकारामुळे नेटीझन्समध्ये काही प्रमाणात नाराजीही व्यक्त होत असल्याचे चित्र दिसत आहे.