|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » व्हॉटसऍपवरील बदनामी जिव्हारी लागल्याने आत्महत्या

व्हॉटसऍपवरील बदनामी जिव्हारी लागल्याने आत्महत्या 

ऑनलाईन टीम / पिंपरी

व्हाट्सऍपमुळे झालेली बदनामी जिव्हारी लागल्याने एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्रकार पुण्यातील खेड राजगुरूनगर तालुक्मयात ही दुदैवी घटना घडली आहे.

आत्महत्या करणाऱया व्यक्तीचे नाव विठ्ठल बारणे असे असून त्यांनी राहत्या दोंदे गावातीलच एका दुकानात खरेदीच्या बहाण्याने भर दिवसा चॉकलेटची बरणी लंपास केली. एक मार्चला घडलेला हा प्रकार दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असता, दुकान मालकाने हा सीसीटीव्ही गावातील व्हाट्सऍप ग्रुपवर व्हायरल केला. गावकरी विठ्ठल यांना चिडवू लागल्यामुळे त्यांची बदनामी सुरू झाली. ही बदनामी जिव्हारी लागली आणि त्यातूनच त्यांनी दशक्रिया विधीच्या घाटाजवळ आज पहाटे गळफास घेवून आत्महत्या केली. असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. याप्रकरणी खेड पोलीस पुढील तपास करत असून कोणी दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करणार आहेत.