|Monday, December 10, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » महिला दिनानिमित्त गूगलचे डुडल

महिला दिनानिमित्त गूगलचे डुडल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी गुगलने अनोखे गुगल डुडल बनवले आहे. महिला दिनाच्या एक दिवसाअगोदरच म्हणजे 7 मार्चपासूनच हे डुडल नेटिझनस यांना दिसू लागले.

या डुडलमध्ये विशेष बाब म्हणजे यात खूप साऱया डिझाइन्स आणि प्रत्येकाची वेगळी गोष्ट दडलेली आहे. यासाठी गुगलने 12 महिला कलाकारांशी डुडलसंदर्भात चर्चा केली. जगभरामधील वेगवेगळय़ा भागातील महिला कलाकारांनी वेगवेगळय़ा गोष्टी सांगितल्या आहेत. या सर्व गोष्टी ‘इंटरनॅशनल गुगल डे 2018’ चा भाग आहेत. प्रत्येक गोष्टींमधुन व्यक्तिमत्व, वेळ आणि घटना सांगितली आहे. 1910 पासून 8 मार्चला महिला दिवस साजरा केला जातो.

 

Related posts: