|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर महावितरणचे परिपत्रक

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर महावितरणचे परिपत्रक 

ऑनलाईन टीम / मुंबई

महावितरणने आजवर कोणत्याही राजकीय पक्षाच्या जाहीर सभेच्या वेळी वीजपुरवठा खंडीत केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत केलेले भेदक वक्तव्य अत्यंत खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया महावितरणने एका परिपत्रकात दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 12 व्या वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱयांचा मेळावा शुक्रवारी 9 मार्च वांदे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित केला. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर येत्या 18 मार्चला शिवतीर्थावर जाहीर सभा घेणार आहे. त्यावेळी महाराष्ट्रातील वीज मंडळाच्या अधिकाऱयांनी वीज घालवली तर त्यांना तुडवा, असे कार्यकर्त्यांना भडकवणारे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.

यानंतर महावितरणने यासंदर्भात परिपत्रक काढून स्पष्टीकरण देत, राज ठाकरेंच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. ‘मूळात महावितरणने आजवर कधीही आणि कोणत्याही राजकीय सभेच्या वेळी जाणीवपूर्वक वीजपुरवठा खंडीत केलेला नसून याबाबत राज यांचे हे चिथावणीखोर वक्तव्य अत्यंत खेदजनक आहे,’ महावितरण आजवर कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी पडलेला नाही. महावितरणचे अधिकारी, अभियंता आणि कर्मचारी हे केवळ आणि केवळ ग्राहकांच्या सेवेचे कर्तव्य पार पाडत असतात. कुठल्याही राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून वीजपुरवठा खंडीत करण्याची प्रथा किंवा संस्कृती महाराष्ट्रातील महावितरणमध्ये नाही. आज राज्यात सर्वत्र वीजेची उपलब्धता योग्य प्रमाणात असल्याने राज्य भारनियमनमुक्त आहे. अशावेळी वीजपुरवठा बंद करण्याचा प्रश्नच नाही. आज महावितरणचा प्रत्येक कर्मचारी थकबाकी वसुली करण्याच्या कामी लागला असून राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा फायदा राज्यातील काही थकबाकीदार घेण्याची शक्मयताच अधिक आहे. त्यामुळे असा प्रकार होणार नाही याची ग्वाही राज ठाकरे यांनी देणे आवश्यक आहे. असे भडकावू वक्तव्य करून महावितरणच्या अधिकाऱयांचे मनोधैर्य खच्चीकरणाचा प्रयत्न कुणीही करू नये, असा सल्ला महावितरणने दिला आहे.