|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » राज्यसभेवर राणे-खडसेंचे पुनर्वसन?

राज्यसभेवर राणे-खडसेंचे पुनर्वसन? 

ऑनलाईन टीम / मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ खडसे यांना दिल्लीत पाठविण्याच्या हालचालीत वाढ झाली आहे. राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकर आणि नारायण राणे यांच्यासोबत खडसे यांचे नाव जोडले जाण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. राणेंनी राज्यसभेची ऑफर स्वीकारली असून, खडसेंचे नाव निश्चित होण्याची शक्मयता आहे.

राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशात निवडणुका होणार आहेत. त्यातील सहा जागा महाराष्ट्रातून लढल्या जाणार आहेत. विधानसभेच्या संख्यांचे बळ पाहता तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो. त्यामुळे या तीन जागांवर महाराष्ट्रातून भाजप कुणाला राज्यसभेवर पाठवते, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.

प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री असून, ते सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे आता ते महाराष्ट्रातून राज्यसभेत जातील. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करून एनडीएशी घरोबा केला आहे. मात्र, राज्यातील मंत्रिपदाच्या आशेवर असणारे राणे सध्या राज्यसभेच्या दिशेने धाव घेताना दिसत आहेत. राज्यसभेची ऑफर राणेंनी विचार करून स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ खडसे हे आरोपांच्या फेऱयात अडकल्यापासून मंत्रिमंडळापासून लांब आहेत. त्यामुळे भाजपच्या या ज्ये÷ नेत्याचे एकप्रकारे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न पक्षाकडून होताना दिसत आहे. 16 राज्यांतील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. 23 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल.

 

Related posts: