|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » डॉ.पतंगराव कदम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

डॉ.पतंगराव कदम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

प्रतिनिधी/कडेगांव, वांगी 

  अंत्यत  शोकाकूल वातावरणात  आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने  माजी मंत्री, आमदार आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक आणि सांगली जिल्हयाचे धडाकेबाज नेते  डॉ.पतंगराव कदम यांच्यावर लाखो जनसुमदायाच्या उपस्थितीत आणि शासकीय इतमामात   शनिवारी वांगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्य मंत्रीमंडळातील आजी माजी मंत्री  सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि लाखोच्या उपस्थितीत डॉ.कदम यांना भावपुर्ण वातावरणात अखेरचा  निरोप देण्यात आला. साहेबांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी सोनहिरा खोरेच नव्हे तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आदी जिल्हयातील लोकांचा अक्षरशः जनसुमदाय लोटला होता.

डॉ.पतंगराव कदम याचे शुक्रवारी मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये निधन झाले . शनिवारी वांगी ता. कडेगांव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यामुळे वांगी येथे   सोनहिरा साखर कारखाना कार्यस्थळाकडे शनिवारी सकाळपासूनच लोकांनी धाव घेतली.

 सकाळी सात ते नऊ या वेळेत  पुणे येथील सिंहगड बंगला, साडेनऊ ते पावणेआकरापर्यंत भारती विद्यापीठ भवन,तेथून पावणेदोनपर्यंत धनकवडी कॅम्पस, येथे लोकांच्या दर्शनानंतर खास हेलिकॉप्टरने पुत्र डॉ.विश्वजीत कदम, बंधू डॉ.शिवाजीराव कदम आणि जावई राजेंद्र जगताप हे डॉ.कदम यांचे पार्थिव घेऊन सोनसळ या कदमसाहेबांच्या मुळ गावी आले. कदमसाहेबांचे पार्थिव आल्याचे पाहताच तेथे अगोदरपासून जमलेल्या गावकऱयांनी आणि कार्यकर्त्यांनी साहेबांच्या दर्शनासाठी घराकडे धाव घेतली.  त्यावेळी घरातील लोक आणि कार्यकर्त्यांनी अक्षरशः हंबरडाच फोडला. पत्नी विजयमाला , कन्या भारती, कन्या, अस्मिता यांच्यासह  विश्वजीत कदम, बंधू मोहनराव कदम आदींना अश्रू अनावर झाले. येथे लोकांना आवरणे अशक्य झाले. सोनसळ येथे पावणेचारपर्यंत  अंतिम दर्शनानंतर फुलांनी सजविलेल्या वाहनांतून  डॉ. पतंगराव कदम यांचे पार्थिव  सोनसळ येथून सोनकिरे, चिंचणी मार्गे वांगी येथे सोनहिरा कारखान्यापासून  जवळच असलेल्या मैदानाकडे नेण्यात आले. कदमसाहेबांचे पार्थिव आल्याचे पाहताच तेथेही लोकानी उभे राहून साहेबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी  गर्दी केली.

मुख्यमंत्र्यांचे चार वाजून 55 मिनिटांनी आगमण.

डॉ.कदम यांच्या अंत्यसंस्कारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे  एकाच हेलिकॉप्टरमधून कराडहून वांगी येथे दुपारी चार वाजून 55 मिनिटांनी  आगमण झाले.

मावळत्या सुर्याच्या साक्षीने साहेबांना अंतिम निरोप.

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास वांगी येथे कारखाना कार्यस्थळावर तयार केलेल्या चबुतऱयाच्या ठिकाणी अंतिम विधीला सुरूवात झाली. कराड येथील शैलेश कुलकर्णी गुरूजी आणि रेठरेहरणाक्ष येथील ढेकणे गुरूजी यांनी हे विधी पार पाडले.  तत्पुर्वी  बंदुकीच्या तीन फैरी झाडून डॉ.कदम यांना  मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजून 56 मिनिटांनी पुत्र डॉ.विश्वजीत यांनी पंतगराव यांना अग्नी दिला. यावेळी बंधू आमदार मोहनराव कदम, डॉ.शिवाजीराव कदम, आत्माराव कदम, जयसिंगराव कदम ,जावई महेंद्रअप्पा लाड, जावई राजेंद्र जगताप  हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामवाकास मंत्री पंकजाताई मुंडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मुंख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तसेच सोनिया गांधी यांच्यावतीने काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावतीने प्रदेशाध्यक्ष खास. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील,   राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आदींनी पुष्पचक्र वाहून डॉ.कदम यांना आदराजंली वाहिली.

यावेळी खासदार उदयनराजे भोसले, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील,  राजीव सातव, माजी मंत्री विनय कोरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, रमेश बागवे, खासदार संजयकाका पाटील, आमदार ,शंभूराजे देसाई,  सतेज पाटील, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, सुमनताई पाटील, आनंदराव पाटील कराड, आम. मकरंद पाटील वाई, आम. भारत भालके पंढरपूर, आम. अनिल बाबर, माजी खास. निवेदिता माने, आम. जयकुमार गोरे माण, शेकापचे आम. जयंत पाटील, माजी मंत्री डॉ.एन.डी.पाटील, माजी आम. दिपकबाबा साळुंखे, माजी आम.सदाशिवराव पाटील विटा, राजेंद्रअण्णा देशमुख, उमाजीराव सनमडीकर, विक्रम सावंत, भगवानराव साळुंखे,   दिनकरतात्या पाटील, माजी आम. शरद पाटील, मदनराव मोहिते,  महापौर हारूण शिकलगार, मनपा गटनेते किशोर जामदार, राजेश नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, प्रतापशेठ सांळुंखे, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, शिवसेनेचे दिगंबर जाधव, बजरंग पाटील, दिपकबाबा शिंदे, सहकार तपस्वी बापूसाहेब पुजारी, भाजपा नेत्या नीता केळकर, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज, गौरव नायकवडी, अरूणअण्णा लाड,  डॉ.प्रताप पाटील, नानासाहेब महाडीक, सी.बी.पाटील, सत्यजित देशमुख, मानसिंगराव नाईक, जयराज पाटील,  मच्छींद्र सकटे, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी.एम. बावळेकर, सुरेश आवटी, दि.बा.पाटील, जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती ब्रम्हानंद पडळकर, अभयसिंह साळुंखे,  रवी तम्मनगौंडा यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, आदी उपस्थित होते.

आर.आर.मदन पाटील व डॉ.कदमांच्या आठवणींना उजाळा

यावेळी अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह  अनेक वक्त्यांनी जिल्हयाचे नेते आर.आर.पाटील, मदन पाटील व डॉ.पतंगराव कदम यांच्या अनेक आठवणी उजाळा दिला.

 कडेगाव आणि पलूस तालुक्यातील अनेक गावामध्ये बंद ठेवून डॉ.कदम यांना आदराजंली वाहण्यात आली.