|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » देऊरचे ग्रामसेवक राहुल कदम यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

देऊरचे ग्रामसेवक राहुल कदम यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 

वार्ताहर/ कोरेगाव

देऊर(ता.कोरेगाव) येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक राहुल दशरथ कदम यांना जिल्हा परिषदेच्यावतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सातारा येथे झाल्या कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते राहुल कदम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

देऊर गावातील विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामीण स्वच्छता मिशन, आवास योजना, घनकचरा निर्मुलन, झिरो पेंडन्सी, आदर्श आमदार योजना आराखडा अशा शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यत पोहचवण्यासाठी सक्रीय योगदानदिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

या यशाबद्दल सभापती रामराजे निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, उपाध्यक्ष वसंत मानकुमरे, कैलास शिंदे, पंचायत समिती सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य मंगेश धुमाळ, सदस्या साधना बनकर, गटविकास अधिकारी सावित्री खरडे, सरपंच निलिमा कदम, उपसरपंच बाळकृष्ण कदम, सदस्य राजेंद्र कदम, प्रदिप कदम, अजित कदम, वसंत जाधव, नंदा कदम, शुभांगी देशमुख, नंदा काकडे, संगीता थोरात, धनश्री राजे व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Related posts: