|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘व्हिओ व्हि 9’ लवकरच भारतीयांच्या भेटीला

‘व्हिओ व्हि 9’ लवकरच भारतीयांच्या भेटीला 

ऑनलाईन टीम / पुणे

   वीवो 27 मार्चला भारतात आपला नवा स्मार्टफोन V9 लाँच करणार आहे. लाँचिंगपूर्वीच या फोनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोनमध्ये डय़ुअल रिअर कॅमेरा असेल, असे व्हायरल झालेल्या फोटोत दिसत आहे.

   फोटोंमध्ये दिसत आहे त्यानुसार, वीवोच्या रिअर कॅमेराची डिजाईन आयफोन X सारखीच आहे. शाओमीने काही दिवसांपूर्वीच लाँच केलेल्या रेडमी नोट 5 प्रोच्या रिअर डय़ुअल कॅमेरामध्येही अशीच डिजाईन दिली होती. दरम्यान, फोनचे फिंगरपिंट सेन्सर बॅक साईटलाच ठेवण्यात आले आहे. या स्मार्टफोनची सर्वात मोठी विशेषता कॅमेरा हीच असण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. 24 मेगापिक्सेलचा प्रंट कॅमेरा असेल, असा दावा केला जातोय. तर क्वँलकॉम स्नॅपड्रगन 660 प्रोसेसरचा वापर करण्यात आला असून या स्मार्टफोनची किंमत जवळपास 25 हजार रूपये असू शकते. यापूर्वी वीवोने आपला स्मार्टफोन V7 मध्ये 5.7 इंच आकाराची स्क्रीन आणि क्वालकॉम स्नॅपड्रगन 450 प्रोसेसर देण्यात आले होते. स्मार्टफोनमध्ये 4GB रॅमसह 32GB इंटर्नल स्टोरेज होते. भारतीय बाजारात V7 ची किंमत 16 हजार 990 रूपये ठेवण्यात आली होती.

 

Related posts: