|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » leadingnews » शेतकऱ्यांनी लढाई जिंकली..!

शेतकऱ्यांनी लढाई जिंकली..! 

सरकारला मागण्या मान्य

ऑनलाईन टीम / मुंबई :

विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱयांनी सुरू केलेल्या लढय़ाला आज यश आले. मंत्रीगट आणि शेतकऱयांच्या शिष्टमंडळात झालेल्या बैठकीत शेतकऱयांच्या मागण्या मान्य करण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आझाद मैदानावर केली. त्यामुळे लाल वादळाची सरकारने दखल घेतल्याचे स्पष्ट झाले असून, हा शेतकरीशक्तीचा विजय असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आंदोलकांच्या परतीच्या प्रवासासाठी विशेष रेल्वेची सोय करणार असल्याची घोषणा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या वेळी केली.

संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचे हस्तांतरण अशा मागण्या मान्य केल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही, अशी गर्जना शेतकऱयांनी केली होती. दहावी-बारावीच्या परीक्षार्थींना त्रास होऊ नये यासाठी शेतकऱयांनी त्रास सोसत रात्रीच आझाद मैदान गाठले. या लाल वादळाची दखल अखेर सरकारलाही घ्यावी लागली. शेतकऱयांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना दिली होती. त्यानंतर शेतकऱयांच्या शिष्टमंडळ आणि मंत्रीगटात सुमारे अडीच तास बैठकी सुरू होती. या बैठकीत शेतकऱयांच्या सगळय़ा मागण्या मान्य झाल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अझाद मैदानावर केली.तसेच याबाबतचा लेखी स्वरूपात ड्राफ्ट तयार केला असून हा ड्राफ्ट शेतकऱयांच्या शिष्टमंडळाला या वेळी देण्यात आला. उद्या विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागण्यांची माहिती देणार आहेत.

 

मान्य झालेल्या मागण्या

 • जीर्ण रेशनकार्ड 6 महिन्यांत बदलून मिळणार
 • नदीजोड प्रकल्पांना गती देण्याचे आश्वासन
 • गायरान जमिनिवरच अतिक्रमण नियमीत करणार
 • 30 जून 2017 पर्यंत कर्जमाफ करणार
 • कर्जमाफीसाठी 2001पासू लाभ मिळणार
 • देवस्थान, इनामी जमिनीबाबत लवकरच निर्णय घेणार
 • कर्जमाफीच्या अटी शिथिल करणार
 • वन हक्क दावे 6 महिन्यांत संपवणार
 • संजय गांधी निराधार योजनेतले मानधन वाढणार
 • आदिवासींचे रेशन कार्ड तीन महिन्यांत बदलणार
 • बंडओळी, गारपीटग्रस्तांच्या भरपाईचे वाटप होणार
 • दूधाचे दर ठरवण्यासाठी वेगळी बैठक होणार
 • राज्य कृषीमूल्य आयोग हमीभाव निश्चित करणार
 • राज्य कृषीमूल्य आयोगावर शेतकरी सदस्य असणर

 

Related posts: