|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अवैध वाळू वाहतुकीचे डंपर रोखणार

अवैध वाळू वाहतुकीचे डंपर रोखणार 

वेंगुर्ले सभापती, सेना तालुका प्रमुखाचा इशारा : शासनाने वाळूचे दर ठरवावे!

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

वाळू माफियांच्याविरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला असून यापुढे अवैधरित्या वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक करणारा एकही डंपर वेंगुर्ले येथून जाऊ देणार नाही, असा इशारा आज सोमवारी सभापती यशवंत परब, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

येथील तालुका शिवसेना संपर्क कार्यालयात घेतलेल्या या पत्रकार परिषदेच्यावेळी शहर प्रमुख विवेकानंद आरोलकर, प्रशांत मेस्त्राr, हेमंत मलबारी, दादा सारंग आदी उपस्थित होते.

उभादांडा येथे वाळू व्यावसायिकांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात काळे झेंडे दाखवून निदर्शने केल्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना परब व दळवी म्हणाले की, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी निदर्शकांना भेटीचे निमंत्रण दिले होते. उभादांडा येथील कार्यक्रमानंतर पुढे कार्यक्रम असतानाही पालकमंत्री काहीकाळ त्यांची वाट पाहत बसले होते. मात्र, निदर्शकांना राजकारण करायचे होते. या गोष्टीचा इश्यू करायचा होता. त्यामुळे ते आले नाहीत.

शासनाने वाळूचे दर ठरवावे!

आज जिल्हय़ात महसूल विभागाकडुन वाळू उत्खननासाठी परवाने देण्यात येतात. मात्र, बऱयाच ठिकाणी अवैधरित्या वाळू वाहतूक करून ती परजिल्हय़ात विकली जाते. वाळू वाहतुकीसाठी दोन ब्रासचे पास असतानाही तीन ते साडेतीन ब्रास वाळू डंपरमधून वाहतूक केली जाते. वाळू रस्त्यावर पडुन अपघातही होतात. ही वाळू अव्वाच्या सव्वा दराने विकली जात आहे. वाळू उत्खननासाठी महसूलकडुन ज्याप्रमाणे परमीटर रॉयल्टी लावली जाते, तशीच शासनाने प्रत्येक ब्रास वाळूचा दर निश्चित करावा. वाळू उत्खननावर बंधने घालावीत. तहसीलदार, पोलीस व वाळू व्यावसायिक यांचे साटेलोटे असल्याने सोमवारी अवैधरित्या वाळू उत्खनन करून त्याची विक्री करणाऱया वाळूमाफियांवर कारवाई केली जात नसल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखविली. त्यामुळे यापुढे वाळू माफियांच्याविरोधात शिवसेनेलाच एल्गार पुकारावा लागेल, असेही यांनी यावेळी सांगितले.

Related posts: