|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग » 2027 मध्ये भारतीय इक्विटी बाजारपेठ 6.1 लाख कोटी डॉलर्सची

2027 मध्ये भारतीय इक्विटी बाजारपेठ 6.1 लाख कोटी डॉलर्सची 

वृत्तसंस्था/ मुंबई

पुढील 10 वर्षांत देशातील सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारमूल्यामध्ये चांगली वृद्धी होणार असल्याचे मॉर्गन स्टॅनलीकडून सांगण्यात आले. 2017 मध्ये भारतीय कंपन्यांचे बाजारमूल्य 2.3 लाख कोटी डॉलर्स होते. 2027 मध्ये ते 6.1 लाख कोटी रुपयांवर पोहोचणार आहे, असे मॉर्गन स्टॅनलीच्या ‘आशियाज फायनान्शियल एस्सेलरेशन – मुव्हिंग सेन्टर स्टेज’ या अहवालात म्हणण्यात आले.

2027 पर्यंत आशियामध्ये भारतीय इक्विटी बाजारपेठ सर्वात वेगाने वाढणाऱया बाजारांपैकी एक ठरणार आहे. 2027 पर्यंत भारताचा सीएजीआय 10.1 टक्क्यांनी वाढत 6.1 लाख कोटी डॉलर्सवर पोहोचेल. चीन आणि हाँगकाँगचा एकत्रित इक्विटी बाजारपेठ 7.9 टक्के सीएजीआरने वाढत 13.8 लाख कोटी डॉलर्सवरून 30 लाख कोटी डॉलर्सवर पोहोचेल. सध्या अमेरिकन इक्विटी बाजारपेठेचे बाजारमूल्य 31 लाख कोटी डॉलर्स असून त्याच्या जवळ पोहोचणार आहे. जपानची बाजारपेठ 8 लाख कोटी डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

 मॉर्गन स्टॅनलीच्या मते आशियातील इक्विटी बाजारांचे मूल्य दुप्पट होत पुढील 10 वर्षांत 56 लाख कोटी डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे. आशियाई बाजारपेठ अमेरिका आणि कॅनडा यांच्या उत्तर अमेरिकेच्या बाजारपेठेला बाजारमूल्याच्या तुलनेत मागे टाकेल. जगातील सर्वात मोठी प्रादेशिक इक्विटी बाजारपेठ ठरणार आहे. या सर्व बाजारमूल्याची एकत्रित वाढ 6.5 टक्क्यांनी होणार असून जीडीपी विकास 6 टक्के असेल. सध्याच्या जीडीपीच्या तुलनेत इक्विटी बाजारमूल्य 118 टक्क्यांवरून 113 टक्क्यांवर पोहोचेल.

उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियाव्यतिरिक्त जी20 देशांत पुढील दशकभरात सरासरी वाढ 3.2 ते 3.4 टक्क्यांनी होईल. जागतिक बाजारात आशियाई बाजाराची वाढ 56 टक्के, उत्तर अमेरिका 29 टक्के आणि युरोपमध्ये हा आकडा 11 टक्के असेल. आर्थिक बाजार विकासात सिंगापूर, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, जपान सर्वात वेगाने वाढत, तर चीन, भारत, इंडोनेशिया, पाकिस्तानची वाढ काही प्रमाणात कमी असेल.

इक्विटी बाजारपेठ

(अपेक्षित वृद्धी लाख कोटी डॉलर्समध्ये)

देश           2017   2027

ऑस्ट्रेलिया. 1.5….. 3

चीन……… 12.3… 27.3

हाँगकाँग… 1.5….. 2.2

भारत……. 2.3….. 6.1

जपान……. 6.2….. 8

पाकिस्तान 0.1….. 0.2

सिंगापूर…. 0.8….. 1.2

इक्विटी बाजार वाढण्याचे कारण

नागरिकांच्या उत्पन्नात वाढ, प्रादेशिक बदल, सुधारणा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक गुंतवणूक क्षमतेचा विकास होत असल्याने इक्विटी, निवृत्तीवेतन फंड, म्युच्युअल फंड, विमा, डेब्ट कॅपिटल बाजारात वाढ होणार आहे.