|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात झाडे तोडण्याचे काम 50 टक्के पूर्ण

चिपळुणात झाडे तोडण्याचे काम 50 टक्के पूर्ण 

चौपदरीकरणाच्या कामासही प्रारंभ,

आणखी काही दिवसांत झाडे तोडण्याचे काम होणार पूर्ण

 

प्रतिनिधी /चिपळूण

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामत रस्त्यात येणारी 50 टक्के तोडण्यात आली आहेत. उर्वरित कामही येत्या काही दिवसांत पूर्ण केले जाणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून चौपदरीकरणाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. खेड तालुक्यात त्याचे काम वेगात असले तरी चिपळुणात मात्र तितकासा वेग दिसून येत नव्हता. अखेर सावर्डे परिसराबरोबरंच वालोपे व अन्य भागातही या कामास प्रारंभ झाला आहे. या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडण्याचे कामही सुरू झाले आहे. परशुराम ते खेरशेत या दरम्यानची झाडे तोडण्याचे काम राजलक्ष्मी सॉमिलला मिळाले आहे. या मिलच्या मालकांनी या परिसरातील झाडे तोडण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी 60 कर्मचारी, जेसीबी, क्रेन, फोकलॅण्ड, ट्रक अशी यंत्रणा लावली आहे. आतापर्यंत 50 टक्के झाडे तोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित झाडेही येत्या काही दिवसात तोडली जाणार आहेत. तोडलेली काही झाडे बाजूला करून ठेवली जात असून काही झाडे अन्य ठिकाणी नेली जात आहेत.

Related posts: