|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » Top News » निगडीत दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

निगडीत दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या 

ऑनलाईन टीम / पिंपरी

निगडीमध्ये 10 वीत शिकणाऱया विद्यार्थ्याची राहत्या घराजवळ हत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या विद्याथ्याचे नाव वेदांत भोसले असे असून त्याची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

निगडीतील माता अमृता शाळेत दहावीला तो शिकत होता. सोमवारी रात्री अभ्यास केल्यानंतर मैत्रिणीला सोडायला गेला होता. तिथून परत येत असतांना अज्ञातांनी त्याच्यावर चाकूच्या धारदार शस्त्राने वार केले. या हल्यात वेदांत जखमी झाला. पूर्णानगर परिसरात वेदांत जखमी अवस्थेत सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घडनास्थळी धाव घेत, वेदांतला रूग्णालयात नेले. मात्र, त्याचावर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. वेदांत हत्या प्रकरणात पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

 

Related posts: