|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » Top News » उपचारासाठी डॉक्टरांकडून मांत्रिकाचा वापर, रूग्णाचा मृत्यू

उपचारासाठी डॉक्टरांकडून मांत्रिकाचा वापर, रूग्णाचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / पुणे

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेली महिला त्वरीत ठीक व्हावी यासाठी डॉक्टरांनी मांत्रिकाला बोलावल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर रूग्णालयाने असे काही घडलेच नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये दाखल झालेल्या एका महिला रूग्णासोबत हा प्रकार घडला आहे. सदर महिलेचा मृत्यू झाला असून तिच्यावर चुकीची शस्त्रक्रिया झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. छातीमध्ये गाठ झाल्याने रूग्णालयात दाखल झालेल्या या महिलेचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे. संध्या सोनवणे असे या महिलेचे नाव आहे. या महिलेला आधी स्वारगेट येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण तब्येत खालावल्याने त्यांना दीनानाथमध्ये हलवण्यात आले आणि आयसीयूत दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर जादुटोणा करण्यासाठी मांत्रिकाला पाचारण करण्यात आल्याचा आरोप तिच्या भावानेच केला आहे. डॉक्टर सतीश चव्हाण यांनी या मांत्रिकाला आणल्याचे व नजर उतरवण्यासाठी उतारा काढल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, बहिणीची तब्येत महत्त्वाची असल्याने आपण त्याबाबत काही बोललो नाही असे या महिलेच्या भावाने पत्रकारांना सांगितले. यासंदर्भातला हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक व्यक्ती हातात फुल घेवून त्या महिलेच्या अंगावरून उतारा फिरवताना दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये नजर उतरवल्याचा संदर्भ अस्पष्ट ऐकायला येत आहे.

 

Related posts: