|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » Top News » केमिस्ट्रीच्या पेपरमधील चुकांमुळे विद्यार्थ्यांना मिळाणार 7 गुणांचा बोनस

केमिस्ट्रीच्या पेपरमधील चुकांमुळे विद्यार्थ्यांना मिळाणार 7 गुणांचा बोनस 

ऑनलाईन टीम / मुंबई

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या केमिस्ट्री विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका असल्याची बाब समोर आली आहे. या चुकांमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना सात गुण मिळाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, केमिस्ट्रीच्या प्रश्नपत्रिकेतील चार प्रश्न चुकीचे असल्याचे समजत आहे. तज्ञ शिक्षकांकडून या प्रश्नपत्रिका तयार करूनही अशा चुका कशा होतात, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. या चुकीमुळे आता नाईलाजाने सर्व विद्यार्थ्यांना सात गुण मोफत मिळणार आहेत. बारावीच्या केमिस्ट्रीच्या पेपरमधील ही मोठी दुसरी चुक समोर आली आहे. पेपरमधील चुका होण्याचाप्रकार हा मागील दोन वर्षापासून होत आहे. यावर्षी 28 फेब्रुवारी 2018 रोजी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर होता. त्यावेळी परळच्या महषी दयानंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर आलेला विद्यार्थी परीक्षेपूर्वी महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात मोबाईलवर व्यस्त होता. महाविद्यालयातील शिक्षकांना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्याचा मोबाईल तपासला असता. त्यावेळी मोबाईलवर 2018 चा केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका आढळून आली. या प्रकाराने परीक्षांच्या चोख आयोजनाबाबत पाठ थोपटून घेणाऱया शिक्षण मंडळाची चांगलीच नाचक्की झाली होती.

 

Related posts: